Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बैलाने शिंग मारल्याने जखमी झालेल्या शेतकर्‍याचा मृत्यू

केज - तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथील रामहरी उत्तमराव चंदनशिव (वय ५०) हे बैलांना वैरण टाकत असताना त्यांना बैलाचे शिंग लागल्याने ते जखमी झाले होते.त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या दवाखान्यात पाठवले होते पण  उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उत्तरेश्वर पिंप्री परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकरी रामहरी उत्तमराव चंदनशिव हे रविवार दि.१५ मे रोजी सायंकाळी शेतात बैलाला वैरणकाडी करत असताना बैलाने शिंग मारुन त्यांना जखमी केले. सदरील शेतकर्‍याच्या गळ्यावर शिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.या झालेल्या घटनेमुळे उत्तरेश्वर पिंप्री परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Monday 16th of May 2022 12:56 PM

Advertisement

Advertisement