माजलगांवात छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात
माजलगांव ( प्रतिनिधी):- माजलगांव येथे काल दि . १४ मे २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली . माजलगांव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य अभिवादन सोहळा पार पडला . यावेळी सर्व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते . यावेळी माजलगांव सहकारी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन पुरुषोत्तमजी जाधव , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय दराडे
ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास भैय्या नेमाने,वंचित बहुजन आघाडीचे धम्मानंद भाऊ साळवे, मल्हार सेनेचे अशोकरावजी डोने,रजित जाधव ,मल्हारी मार्तंड बँकेचे चेअरमन विशालजी देवकते, राष्ट्रमाता जिजाऊ सहकारी शिक्षक पतसंस्थेचे सचिव हनुमानजी होके सर, पाडुरंग गोंडे , सामजिक कार्यकर्ते हितेंद्र काळे, नारायणजी झोडगे,
दिलीपरावजी धुमाळ ,गोविंद काळे व इतर तरुण सहकारी उपस्थित होते.
