Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पट्टीवडगाव प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा - धनंजय मुंडेंचे एसपीना निर्देश

अंबाजोगाई - तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटनेत एका अल्पवयीन युवतीने आत्महत्या केली असून, या प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. 

पट्टीवडगाव येथील दिपाली रमेश लव्हारे या महाविद्यालयीन तरुणीने एका शेजारील मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त समजले असून, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या पद्धतीची प्रकरणे बीड जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाहीत, संबंधित घटनेची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर केली जाणार नाही. सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर शासन केले जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Friday 13th of May 2022 07:49 PM

Advertisement

Advertisement