Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बर्दापूर - अंबासाखर महामार्गाच्या त्वरित चौपदरीकरणाचे केंद्रीय मंत्री गडकरींचे आश्वासन

खा. प्रीतम मुंडेंच्या मागणीला दिला सकारात्मक प्रतिसाद

अंबाजोगाई : लातूर ते अंबाजोगाई महामार्गावर बर्दापूरपासून पुढे अरुंद रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत असून आतापर्यंत ५७ प्रवाशांचा बळी गेला आहे. त्यामुळे बर्दापूर ते अंबासाखर दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन बीडच्या खा. प्रीतम मुंडे यांनी केली. 

 लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग बर्दापूरपासून पुढे दुपदरी होतो. अचानक अरुंद होणाऱ्या या रस्त्यावर आतपर्यंत ५७ जणांनी अपघातात जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर खा. प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी (दि.०३) महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत अंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर नजीक असलेल्या अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.१२० खा. मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सदरील दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा विषय गडकरी यांच्यासमोर मांडला. या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे आवश्यक अंतरात रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येईल असा सकारात्मक प्रतिसाद गडकरी दिला. तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या आहेत.

 दरम्यान, खा. मुंडे यांनी अपघातप्रवण क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वाढते अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच्या अंमलबजावणीचे काम सध्या प्रगतीपथावर असून रस्त्यावर सूचना फलक आणि काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. 

 चौपदरीकरणासाठी पाठपुरावा सुरु

या मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रादरम्यान तात्काळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे,लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यश येईल हा विश्वास आहे.आपण सर्वांनी या मार्गावर प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावे व काळजी घ्यावी असे आवाहन खा. प्रीतम मुंडे यांनी केले आहे. 

Thursday 12th of May 2022 10:22 PM

Advertisement

Advertisement