Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीडमध्ये धावत्या कारने घेतला पेट

बीड - शहरातील वर्दळीच्या अण्णाभाऊ साठे चौक परिसरातून बसस्थानकाकडे निघालेल्या कारने अचानक पेट घेतला 12 मे रोजी सायंकाळी 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास कार क्र.(एम एच 43 डी 7911) शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात होती.कार साठे चौकानजीक आलेली असताना समोरील बोनेट खालील बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाले, त्यामुळे काही क्षणात बॅटरीसह बोनेटने पेट घेतला. आग वाढत असल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने कार रस्त्याच्या बाजूला घेतली. या परिसरात बांधकाम सुरू असून तेथील पाणी आणून तातडीने ही आग विझवण्यात आली. वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती.

Thursday 12th of May 2022 09:07 PM

Advertisement

Advertisement