Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मळणी यंत्रात शिर गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

बीड  - बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. बाजरीचे खळे चालू असतांना मळणी यंत्रात महिला ओढली गेली. मळणी यंत्रात गेल्यानंतर महिलेचे शिर धडा वेगळे झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात संगम जळगांव येथे गुरुवार रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बाजरीचे खळे मळणी यंत्राद्वारे चालू होते. मळणी यंत्रात बाजरी टाकत असतांना सुमित्रा सुदाम पांगरे (वय 30) वर्ष यांचा तोल गेला असता त्यांना मळणी यंत्राने आतमध्ये ओढले. यावेळी सुमित्रा पांगरे यांचे शिर धडा वेगळे झाले. यात त्यांचा जागिच मृत्यू झाला. या घटनेमुळे संगम जळगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अपघाताची शृंखलाच सुरु आहे. रस्ते अपघातात चार दिवसांत आष्टी, गेवराई, परळी, केज व धारुर तालुक्यात जवळजवळ आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. बुधवारी रात्री आष्टी तालुक्यात बीडच्या प्रतिष्ठित व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटूंबातील चौघांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. यातच आज मळणी यंत्रात गेल्याने महिला दगावल्याचा प्रकार समोर आला आहे

Thursday 12th of May 2022 03:57 PM

Advertisement

Advertisement