Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

गोविंदा...गोविंदा च्या जयघोषाने माजलगांव दुमदुमले

बालाजी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शोभयात्रेने प्रारंभ

माजलगांव (प्रतिनिधी):-शहरातील गजानन नगर येथे संपन्न होणाऱ्या बालाजी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रा राजस्थानी मंगल कार्यालयातून  काढण्यात आली.भगवान व्यंकटेश विराजमान असलेली पालखी, देवी नृत्य व वाद्यालम माजलगांवकराचें लक्ष वेधून घेत होते.


        हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती माजलगांव शहरातील गजानन नगर येथे साकारण्यात आली असून १८,१९,२० रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्त आज भव्य शोभायात्रा राजस्थानी मंगल कार्यालय येथून आंबेडकर चौक शिवाजी चौक मार्गे बालाजी मंदिर येथे पोहचली. बालाजी मंदिर परिसरात बाहेरगावाहून आलेल्या राजस्थानी बांधवांचा व राजकीय मान्यवरांचा बालाजीची प्रतिमा देऊन राजस्थानी समाजाकडून सन्मान करण्यात आला.भोजनानंतर शोभयात्रेने विसर्जन करण्यात आले.तर मंदिर परिसरात महायज्ञा व महापूजा ,गोपूजन करण्यात आले

     या शोभयंत्रेस आ प्रकाश सोळंके,भाजप नेते रमेश आडसकर,मुबंई कृउबा चे सभापती अशोक डक,जि.प सभापती जयंसिह सोळंके,मंत्री बँकेचे चेअरमन सुभाषचंद्र सारडा,भाजप नेते जुगलकिशोर लोहिया,शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,भाजप नेते नितीन नाईकनवरे,राहुल जगताप,नगराध्यक्ष शेख मंजूर,ज्ञानेश्वर मेंडके,माजी नगरसेवक तुकाराम येवले,भाजप तालुकाध्यक्ष अरून राऊत, हनुमान कदम,भाजप शहराध्यक्ष सुरेश दळवे,नगरसेवक दीपक मेंडके,रोहन घाडगे,राहुल लंगडे,विनायक रत्नपारखी,प्रशांत पाटील,दत्ता महाजन यांनी भेट दिली.

       शोभयात्रेच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष विनोदकुमार जाजू,तालुका सचिव उमेश जेथलिया,जुगलकिशोर झंवर,बाळाप्रसाद भुतडा,दिलीप रांधड,प्रा कमलकिशोर लड्डा,शहराध्यक्ष विपीन नावदंर,सचिव रांकिशोर लड्डा, जैन संघटनेचे प्रदीप रेदासनी,सचिन रेदासनी,संकेत दुगड,विप्र समाजचे श्याम कांकर,ओमप्रकाश दायमा, सतसंग सेवा मंडळाचे शिवप्रसाद भुतडा,नितीन मुंदडा, लक्ष्मीकांत मानधने,डॉ संजय जेथलिया आदींनी परिश्रम घेतले.

Monday 18th of October 2021 07:39 PM

Advertisement

Advertisement