Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीचे १९ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजन

काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे-जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे आवाहन

अंबाजोगाई -  बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मंगळवार,दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विद्या व्हॅली ग्लोबल स्कुल,आरटीओ कार्यालयासमोर,अंबाजोगाई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक पातळीवर आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बांधणी व बळकटी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.तरी या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी,विविध सेलचे अध्यक्ष यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की,मंगळवार,दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विद्या व्हॅली ग्लोबल स्कुल,आरटीओ कार्यालयासमोर,अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष,पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत जिल्हा कमेटीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सेलचे अध्यक्ष यांच्याशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.याप्रसंगी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील,माजी मंञी अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येत आहे.आगामी काळात होणा-या जिल्हा परीषद,पंचायत समिती,नगरपरिषद,नगरपंचायत,ग्रामपंचायत आदींसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका होणार आहेत.काँग्रेस हा जनसामान्यांचा आणि सर्वधर्मसमभाव जोपासणारा पक्ष आहे,भारतीय जनतेला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.हे आपण सर्वजण जाणतच आहात.आजही काँग्रेस पक्षावर लोकांचा मोठा विश्वास आहे.या विश्वासाला पुन्हा एकदा जागे करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीकडून सातत्यपूर्ण बैठका आयोजित करण्यात येतात.तसेच विविध उपक्रम देखिल राबविण्यात येतात.यापुढे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सर्व बैठका वेगवेगळ्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत.पहिली बैठक बीड येथे घेण्यात आली.तर दुसरी बैठक उद्या अंबाजोगाईत घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिली.तरी मंगळवार,दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अंबाजोगाई येथे होणा-या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार,पदाधिकारी, नगरसेवक,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,माजी तालुकाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्याक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया,इंटक आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी यांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचेकडून करण्यात आले आहे.

Monday 18th of October 2021 06:49 PM

Advertisement

Advertisement