Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारं संपन्न

माजलगांव  (प्रतिनिधी):-  गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने देशभरातील सर्व कंपन्या , उद्योगधंदे आदि बंद होते . मात्र आपल्या बळीराजाचीच एकमेव कंपनी चालू होती . या दरम्यान शेतक - यांनी दुध , अन्नधान्य , भाजी नागरीकांना पुरवण्याचे काम केले असे प्रतिपादन व्यक्त करुन शेतकऱ्यांनी ऊसाची एकरी क्षेत्र वाढवण्यापेक्षा उत्पन्न वाढीसाठी टनेज वाढवावे असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी उपस्थीत ऊस उत्पादकांना केले . तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या ३० व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दिनांक १७/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला . यावेळी ह.भ.प.श्री.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन शुभारंभ करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री आ.प्रकाशदादा सोळंके होते . तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डक , चेअरमन श्री . धैर्यशीलकाका सोळंके होते . यावेळी व्यासपीठार जि.प. सभापती जयसिंहभैय्या सोळंके , मुंबई बाजार समिती सभापती अशोकराव डक , बाबुराव पोटभरे , माधव निर्मळ , सभापती कल्याण आबुज आदि उपस्थीत होते . यावेळी उपस्थीत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करताना पंजाबराव डख म्हणाले की , मी फक्त हवामानावरुन अंदाज व्यक्त करत असतो . उद्यापासुन हवामान कोरडे राहणार असुन ३ नोव्हेंबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे . भारत कृषीप्रधान देश असुन ८० % लोक शेती करतात त्यात ५० % शेतकरी जिरायती तर ३० % शेतकरी बागायती शेती करतात तर उर्वरीत २० % लोक नोकरी करतात असे सांगत ते पुढे म्हणाले की , १ ९९ ५ पर्यंत पावसाचे प्रमाण चांगले होते . परंतु नंतरच्या काळात औद्योगिक क्षेत्र वाढल्याने प्रदुषण वाढले याचा परिणाम निसर्गावर होऊन पावसाचे प्रमाण कमी झाले . मात्र गेल्या दोन तीन वर्षात पावसाचे पुन्हा चांगले आगमन झाले असुन भविष्यातही काही वर्षे हे प्रमाण चांगले राहणार आहे . पूर्वी ३८ ते ४० अंश असे तापमान असायचे मात्र गेल्या काही वर्षात हे तापमान ४५ अंशापेक्षा जास्त होत आहे . कारण पृथवीचे तापमान वाढत असल्यामुळे पाऊस पडत आहे . पृथ्वीचे तापमान नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एकंतरी झाड लावावे . वृक्ष लागवडीमुळे तापमान नियंत्रणात येण्यास मदत होते असे सांगुन ऊस उत्पादकांसाठी आगामी काळ चांगला असून शेतकऱ्यांनी ऊसाचे टनेज वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले . तर आपल्या आशिर्वादपर भाषणात ह.भ.प. श्री महादेव महाराज म्हणाले की , लोकनेते सुंदररावजी सोळंके यांनी लावलेले हे रोपटे प्रकाशदादा व धैर्यशीलकाका यांनी मोठ्या कष्टाने वाढवत असून या कारखान्यामुळे शेतक - यांचे आर्थीक जिवनमान उंचावत असून त्यांची आर्थीकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होत आहे . शेतक - यांनीही हा कारखाना आपलाच आहे हे समजुन मा.दादा व मा . काका यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन श्री . धैर्यशीलकाका सोळंके यांनी करून कारखान्याच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेवून चालु हंगाम हा मोठा हंगाम असून या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी , तोड वहातुक ठेकेदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले . या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ , यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री . एम . डी . घोरपडे , सर्व खातेप्रमुख , अधिकारी , कर्मचारी उपस्थीत होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संचालक श्री प्रकाशनाना शिंदे यांनी केले .

Monday 18th of October 2021 06:20 PM

Advertisement

Advertisement