Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

किल्लेधारुर ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांचे लसीकरण.

किल्लेधारुर  - येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींसाठी बीड समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत कोविड-१९ लसीकरण करण्यात आले.

    बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या आदेशानूसार शहरातील निवासी मतीमंद विद्यालयातील कर्मचा-यांनी शहरात सर्व्हे करुन दिव्यांग व्यक्तींना लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाऊन मिशन कवच कुंडल मोहिमेआंतर्गत कोविड-१९ ची लस देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक नोडल अधिकारी संजीवन टोणगे, संतोष सुरवसे, विलास गाढवे, त्रिंबक कोळेकर, रमेश साखरे, आशा यादव, महादेव कांदे, श्रीनिवास शिनगारे आदी कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

Saturday 16th of October 2021 08:41 PM

Advertisement

Advertisement