Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

महिला प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांची विशेष मोहिम

बीड - बीड जिल्हयाचे पोलीस अधिक्षक आर राजा आणि अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांचे संकल्पनेतून जिल्हा वाहतुक शाखेतर्फे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अ‍ॅटो रिक्षा व टॅक्सी यांमध्ये आपत्कालीन मदत क्रमांक व अ‍ॅटो/टॅक्सी चालकांची माहिती असणारी पत्रके चिटकविण्याचे मोहिमेस आजपासुन प्रारंभ करण्यात आला.
सदर मोहिमेंतर्गत बीड जिल्हयातील महत्वाचे शहरांमध्ये प्रत्येक परवानाधारक अ‍ॅटोमध्ये चिटकिवण्यात येणार्‍या पत्रकांमध्ये आपत्कालीन पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112. पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 0244222333 महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 जेष्ट नागरीक हेल्पलाईन क्रमांक 1090, अ‍ॅटो चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व फोटो इत्यादींचा सामावेष असणार आहे.
सदर मोहिमेमध्ये बीड जिल्हयातील प्रत्येक अ‍ॅटोमध्ये सदर पत्रके चिटकिवण्याचा उददेश आहे, ज्यामुळे प्रत्येक प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांची योग्य वेळेत मदत मिळणे सोपे होऊन अप्रिय घटना टाळता येणे शक्य होणार आहे. तरी महिला, मुले व जेष्ठ नागरीकांनी अडचणीचे काळी सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहण  पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी केले आहे.

Wednesday 13th of October 2021 08:20 PM

Advertisement

Advertisement