Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

बीड : बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. बीडचे जिल्हा उप निबंधक विश्वास देशमुख यांनी शनिवारी मंत्री बँकेच्या प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली. 

बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर सुभाष सारडा यांचे वर्चस्व होते. बीड जिल्ह्यातील द्वारकादास नागरी सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून सुभाष सारडा यांचे वर्चस्व आहे. मात्र मागच्या काही वर्षात या बँकेसंदर्भाने अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. स्टट्युटरी ऑडिटमध्ये देखील बँकेवर अनेक ताशेरे ओढण्यात आले होते. यासंदर्भाने बँकेची चौकशी कसूर करण्यात आली होती. यासर्व पार्श्वभूमीवर अखेर या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांना बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी शनिवारीच पदभार घेतलत्याने सुभाष सारडा यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

ठेवीदारांनी घाबरून जावू नये बँकेची परिस्थिती उत्तम रिझर्व्ह बँकेने प्रशासकी नियुक्तीची कारवाई हि प्रशासकीय अनियमिततामुळे केली आहे. त्या लवकरच दूर केल्या जातील. बँकेची परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये लवकरच बँकवर पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ पेईल अशी प्रतिक्रिया प्रशासक विश्वास देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Saturday 25th of September 2021 11:14 PM

Advertisement

Advertisement