Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मांजरा धरण भरले, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

केज - तालुक्यातील केज धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने (100 टक्के) मंगळवारी (ता.21) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून 1.27 प्रति सेघमी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती अभियंता शाहुराज पाटील यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यासह शेजारच्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सिंचन व पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले आहे.
त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या सिंचन व पाणीपुरवठा योजनेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. अत्यंत महत्त्वाचे असणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार असल्याचे गृहीत धरून पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून 1.27 प्रति सेघमी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले आहे.

Tuesday 21st of September 2021 08:44 PM

Advertisement

Advertisement