Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मुलाच्या मृत्यूने खचलेल्या पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई - एकुलत्या एक मुलाचा सात महिन्यांपूर्वी मेंदू विकाराने मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या विरहाने खचलेल्या पित्याने सासरवाडीत लिंबाच्या झाडास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) येथे बुधवारी दुपारी घडली. कैलास यादवराव वरपे (वय ५०, रा. साळेगाव ता. केज) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.

साळेगाव येथील कैलास यादवराव वरपे यांच्या प्रशांत या १६ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मेंदूच्या आजाराने २२ नोव्हेंबर २०२० रोजी सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. तेंव्हापासून मुलाच्या मृत्यूच्या विरहाने कैलास वरपे हे खचून गेले होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेत त्यांनी बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) या सासुरवाडीत मेव्हणे दगडू संभाजी मुळे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक नानासाहेब धुमाळ, पोलीस नाईक कल्याण सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचे मेव्हणे दगडू संभाजी मुळे (रा. डिघोळअंबा) यांच्या खबरेवरुन युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Wednesday 21st of July 2021 09:10 PM

Advertisement

Advertisement