Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आधी प्रेयसीने व नंतर प्रियकराने घेतला गळफास

प्रेमी युगुलाच्या आत्महत्येने केज तालुक्यात खळबळ

केज : मजरी कामासाठी कोल्हापूरला गेलेल्या तरुणाचे शेजारच्या महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन महिन्यापूर्वी ते दोघेही उत्रेश्वर पिंपरी (ता. केज) येथे राहण्यास आले. त्यानंतर मंगळवारी (२१ जुलै) सायंकाळी आधी प्रेयसीने आणि नंतर प्रियकराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या दोघांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी घेंडे हा त्याच्या आई वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात वास्तव्यास होता. तो कोल्हापूरात मजुरीचे काम करत असताना घराशेजारी राहत असलेल्या सावित्री शी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. सावित्री च्या पतीचे निधन झालेले असून तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन महिन्या पूर्वी हे प्रेमी युगल कोल्हापूर येथून केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथे येऊन आकाश धेंडे याच्या घरी राहत होते. मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्या नंतर सावित्र ने घरातील लोखंडी आडूला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी आल्या नंतर त्याला हा प्रकार दिसून आल्याने त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेत शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेत तिला दाखवले असता तिने सावित्री मयत झाल्याचे आकाशला सांगितले.

सदर महिला तिथून निघून गेल्या नंतर मंगळवारी रात्रीच आकाश धेंडे यानेही घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने या बाबत केज पोलिसाना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे व बिट अमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान मयत प्रेमी युगलाचे शवविच्छेदन केज उपजिल्हा रुग्णालयात डॉ. घुले यांनी केले असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे करत आहेत.

Wednesday 21st of July 2021 08:33 PM

Advertisement

Advertisement