Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

दिलासा व एसबीआय फाऊंडेशनच्या माध्यमातून हिंगणी येथे कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

धारूर  -  दिलासा व एसबीआय फाउंडेशन च्या वतीने धारुर तालुक्यातील हिंगणी येथे 30 बेडचे अध्ययावत कोविड केअर सेंटर चा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी संपन्न झाला. माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके, बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे,जि प सभापती जयसिंह सोळंके, दिलासा फाऊंडेशनचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले, उपप्रबंधक राजाराम चव्हाण, सहाय्यक व्यवस्थापक सहारा सर,सरपंच मीरा खाडे,प्राथमिक आरोग्य केंद्र मोहखेडच्या आरोग्य अधिकारी डॉ. उषा बांगर, जैतापूरचे उपसरपंच भागवत दराडे,उपसरपंच योगेश सोळंके,पत्रकार संतोष स्वामी   रंणजित रूपनर या कार्यक्रमास उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भयंकर सावट पसरणार असल्याचे चित्र आता निर्माण होत आहे या लाटेत ग्रामीण भागाला  त्रास होऊ नये या हेतूने एसबीआय फाउंडेशन व दिलासा फाउंडेशन यांनी एकत्रित येत हिंगणी बुद्रुक येथे तीस अध्ययावत बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळणार आहेत.या केअर सेंटर मध्ये पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सह ऑक्सीजन मशीन व आधुनिक यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावस्थ गंभीर रुग्णांना कोविंड सेंटरला नेण्यासाठी ॲम्बुलन्स ची हि व्यवस्था करण्यात येणार आहे.येत्या सहा महिन्यात या कोविड केअर सेंटर च्या माध्यमातून जवळपास 48 लाख रुपयांचा खर्च एसबीआय फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी खर्च करणार असल्याची माहिती एसबीआय फाउंडेशन च्या वतीने देण्यात आली.

कोरोना च्या तिसऱ्या लाटेचे महाभयंकर स्वरूप पाहता सर्वांनी खबरदारी घेत, मास्क,सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा पालन करण्याचा  सल्ला आपल्या भाषणातून आमदार प्रकाश सोळंके , डॉ. सुरेश साबळे यांनी उपस्थितांना दिला.नंदकिशोर भोसले, राजाराम चव्हाण जयसिंह सोळंके यांचे समायोजित भाषणे झाली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलासा चे वलीअहेमद तांबोळी, एकनाथ शिंदे, सह हिंगणी येथील अवधूत सोळंके, अमर डोंगरे, भगवान हवेले, बाळासाहेब सोळंके, लहू उंडाळकर, किरण सोळंके, अविनाश पंचाळी ,अविनाश सोळंके, बालासाहेब सोळंके, मुख्याध्यापक राठोड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सोळंके तर आभार प्रदर्शन रंणजित रूपनर यांनी केले.

Tuesday 20th of July 2021 09:00 PM

Advertisement

Advertisement