Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत नागरिकांची गर्दी

मोंढा ,बीड रोड ,डॉ. आबेडकर चौक,हनुमान चौक इतर ठिकाणीणच्या रस्तायांवर लोकच लोक

माजलगांव,(प्रतिनिधी):-कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनच्या घोषणेला सशर्त सूट दिल्यानंतर आज सकाळी माजलगांव शहरात  , मोंढा बीड रोड ,डॉ. आबेडकर चौक,हनुमान चौक भागासह इतर भागात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती . रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन्ही सण तोंडावर असताना बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती . गर्दी टाळण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत मात्र लोक पुन्हा गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे .

         महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने १५ मेपर्यंत निर्बंध लावलेले आहेत . बीड जिल्ह्यातही कडक नियमावली लावली असून जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते दहा या वेळेत अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आली आहे . त्यामुळे बाजरात आज प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली .  मोंढाबीड रोड ,डॉ. आबेडकर चौक,हनुमान चौक यासह अन्य ठिकाणी सकाळी लोकच लोक दिसून येत होते . रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन सण तोंडावर आले असल्याने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते . सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे आजच्या गर्दीवरून दिसून आले . गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर नियमावली लावली मात्र लोक जास्तच गर्दी करत कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे .

Tuesday 11th of May 2021 08:19 PM

Advertisement

Advertisement