Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आझाद नगर भागात मुस्लिम बांधवान रमजान ईद निमीत्त किट चे वाटप

किल्लेधारूर   - धारूर येथे आझादनगर भागात संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य प्रदीप नेहरकर यांनी रमजान ईद निमीत्त मुस्लिम समाज बांधवाना  मान्यवराचे  हस्ते घरगुती उपयोगी साहीत्याचे किट चे वितरण करण्यात आले.सामाजीक सलोख्याचा संदेश देण्यात आला.

धारूर येथे आझाद नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कर्यकर्ते तालूका निराधार योजना समिती चे सदस्य प्रदीप नेहरकर यांनी रमजान ईद निमीत्त कोरोना लाॕकडाऊन चा कालावधी असल्याने गरजू व्यक्तीना हा सण उत्साहात व नियमाचे पालन करत साजरा करण्या साठी गरजू साहीत्याचे किट वितरण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर शहराध्यक्ष नितिन शिनगारे निराधार योजन समिती सदस्य प्रदीप नेहरकर युवक नेते गौतम चव्हान शौकत शाह शेख शाकेर रहीम तांबोळी सुभेदार सय्यद इस्माईल आदीचे उपस्थीत या भागातील गरजूना या किटचे वाटप करून रमजान ईद आनंद द्विगूणीत करण्याचे काम केले व सामाजीक सलोख्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या वेळी या भागातील नागरीक उपस्थीत होते .

Tuesday 11th of May 2021 07:30 PM

Advertisement

Advertisement