Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

उपलब्ध व्हेंटिलेटरचा पुर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी स्वारातीत अजून एक ऑक्सीजन प्लांण्ट उभारावा

आ. नमिता मुंदडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंबाजोगाई - स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर पैकी
अजूनही आठ व्हेंटीलेटर ऑक्सीजन नसल्यामुळे वापरण्यात येत नसुन ही व्हेंटीलेटर सुरू करण्यासाठी या परीसरात आणखी एक ऑक्सीजन निर्मितीचा प्लांण्ट सुरू करण्यात यावा. अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
       या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे सध्या कोवीड रुग्णांसाठी दोन आय.सी.यु. वार्ड आहेत. दोन्ही वार्ड मध्ये ३२ बेड आहेत. परंतु सध्या फक्त २४ व्हेंटिलेटरच चालू आहेत. आणखी ८ व्हेंटिलेटर उपलब्ध असूनही ऑक्सीजन पुरत नसल्यामुळे बसवले नाहीत. याबाबत अधिक माहिती घेतली असता, ऑक्सिजन प्रेशर नसल्यामुळे सदरील व्हेंटीलेटर सुरू करण्यासाठी अडचण येत आहे असे समजते. तसेच मेडिसिन विभागाचे जुने वार्ड क्र. १२ येथेही आय.सी.यु. वार्ड व्हेंटिलेटरसहीत करता येवू शकतो. त्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत आपण आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत. परंतु, ऑक्सिजन प्रेशर मिळत नाही त्यासाठी आणखी एक ऑक्सिजन प्लांट त्वरीत उभा करणे आवश्यक आहे. 
सध्या आय.सी.यु. बेड आवश्यक असलेले रुग्णसंख्या जास्त आहे. परंतु, बेड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रुग्णांवर उपचार होत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक  डॉक्टर्स हतबल होत आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनास वारंवार सांगूनही याबाबत कार्यवाही नाही. आय. सी. यु. बेड व्हॅटिलेटरसहित वाढवण्याबाबत मी प्रशासनास वारंवार सूचित केले आहे.
तरी आपण यावर कायमस्वरूपी मार्ग काढून आय. सी. यू. बेड व्हॅटिलेटरसहित वाढवण्याबाबत आदेश द्यावेत.
   या सोबतच केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे असलेली रुग्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु अँटीजेन टेस्ट कीट अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांचे टेस्टिंग करण्यात मोठा अडथळा येत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर अँटीजेन टेस्ट कीट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याबाबत आदेश द्यावेत.
अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदनाच्या प्रति  अमित देशमुख,  वैद्यकीय शिक्षण मंत्री, मा. राजेंद्रजी पाटील (यड्रावकर) , राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग, 
 संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुक्त (महसूल), मराठवाडा विभाग, औरंगाबाद,
जिल्हाधिकारी, बीड.
अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत.

Monday 10th of May 2021 07:54 PM

Advertisement

Advertisement