Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक; बहुतांशी अत्यावश्यक सेवाही राहणार बंद!

बीड : जवळपास तीन आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू असूनही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे दिसून येत नाही. रस्त्यांवरील गर्दी बऱ्यापैकी कमी झाली असली तरी अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अजूनही लोक घराबाहेर पडतच आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांच्या सुरू राहण्यावरही बंधने घातली आहेत. पुढील तीन दिवस किराणा, भाजीपाला विक्रीची दुकाने देखील बंद असणार आहेत. 

सोमवारी (दि.०३) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेल्या आदेशानुसार,

१. बुधवार, गुरुवार व शुक्रवार (दिनांक ५, ६ व ७ मे २०२१) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.

२. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहील.

३. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.

४. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु.१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील.

५. शनिवार व रविवार रोजी (दिनांक ८ व ९ मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना (किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित इ. केवळ ०७:०० ते ११.०० या वेळेत चालू राहतील. 

६. तसेच शनिवार व रविवार रोजी (दिनांक ८ व ९ मे१) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकांळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल.

येथे क्लिक करून आदेशाची प्रत डाऊनलोड करा.

Tuesday 4th of May 2021 10:56 AM

Advertisement

Advertisement