Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

श्रीरंगराव मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन

अंबाजोगाई : शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा शरद जोशी यांचे खंदे समर्थक श्रीरंग मोरे याचे वृध्दापकाळाच्या आजाराने निधन झाले.

अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मोरेवाडी येथील सधन शेतकरी श्रीरंगराव मोरे हे उमेदीतील वयापासुनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अग्रेसर होते. येथील अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक व काही काळ चेअरमन ही राहीले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वर्ग १ चे अधिकारी असलेल्या शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतर ते शेतकरी संघटनेशी जोडल्या गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांची अचुक जाण असलेले नेते म्हणून श्रीरंगराव मोरे यांनी शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. 

अंबाजोगाई येथे  १९८४ दरम्यान भरवण्यात आलेल्या ज्वारी परीषदेचे ते संयोजक होते. प्रकृती साथ देईपर्यंत त्यांनी शेतकरी संघटनेची पताका आपल्या खांद्यावर घेवून काम केले. शेतकरी संघटना मजबूत व दृढ करण्यासाठी सदैव कार्यरत राहिलेले शेतकरी वर्ग यांच्या उन्नतीचा मजबूत खांब असलेले श्रीरंगराव मोरे हे गेली अनेक दिवसांपासून वृध्दापकाळाच्या विविध आजाराने आजारी होते. आज दुपारी एक वाजता त्यांनी आपल्या मोरेवाडी येथील राहत्या घरी अंतीम श्र्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुली- जावाई, दोन मुले-सुना, नातवंडे आदि मोठा परीवार आहे.

Monday 3rd of May 2021 09:39 PM

Advertisement

Advertisement