Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

दुचाकी-अ‍ॅपेरिक्षाचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार


परळी - परळी बीड रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (ता.03) सकाळी 10 च्या सुमारास दुचाकी व अँटोरिक्षाच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
परळी बीड रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी नाना उर्फ राम शिवाजी गायकवाड (वय 30) संगम या गावाकडून परळीकडे येत आपल्या बुलेट दुचाकीवर (एम एच 22, ए.ई. 1112) येत असताना समोरून येणार्‍या अँटोरिक्षास जोराची धडक बसली, या धडकेत दुचाकीस्वार नाना गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन गायकवाड यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता.घरातील कर्ता युवक गेल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.घटनास्थळी तात्काळ संभाजीनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Monday 3rd of May 2021 08:28 PM

Advertisement

Advertisement