Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

जयसिंग सोळंकेकडून कोविड सेंटरला दररोज मिळणार ५ हजार लिटर पाणी;

किल्लेधारूर - येथील कोविड केअर सेंटरमध्ये काही दिवसांपासून पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषदेचे अर्थ, नियोजन व बांधकाम सभापती यांनी तात्काळ आज सकाळी ६ वाजता पाण्याचे अग्निशामक पाठवले असून दररोज पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांनी दिली.

सध्या तालुक्यात दररोज ६० ते ८० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे येथील कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने भरत आहेत. दररोज येणाऱ्या नवीन रुग्ण संख्येमुळे स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे. कोविड सेंटरमध्ये यामुळे अपुरे पाणी  पुरवठा, अस्वच्छता सारखे प्रश्न निर्माण होत आहेत. काल एका रुग्णांने पाणी नसल्याचा लाईव व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर माध्यमातून याची चांगलीच चर्चा झाली.  याप्रकाराची दखल जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके यांनी घेतले. तालुक्यातील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक वाहनातून दररोज पाच हजार लिटर पाणी पाठवण्याची घोषणा केली. आज याची सुरुवात करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांनी दिली.

Monday 3rd of May 2021 07:36 PM

Advertisement

Advertisement