Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कारी विद्युत उपकेंद्राची कंपाउंड भिंत तोडून टिप्पर आत घुसला

दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ,चालक फरार, तीन लाख रुपयांचे नुकसान

किल्ले धारूर  - तील भोगलवाडी फाटा जवळील कारी विद्युत उपकेंद्राची कंपाउंड भिंत तोडून परळी येथून थर्मलची राख घेऊन धारूर कडे जाणारा टिप्पर आत घुसला यामुळे विद्युत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

काल सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास तेलगाव धारूर या रोडवर असलेल्या कारी उपकेंद्रत एक वेगाने जाणारा टिप्पर क्र एम एच ४४  ९४८८ कंपाऊंडच्या भिंती तोडून आत मध्ये घुसला या टिप्परने पाच ते सहा पूल  तोडून आत मध्ये घुसल्याने  विद्युत उपकेंद्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे

 याच रोडवरून अमित सद्दिवाल यांनी विद्युत जोडणी घेतली होती त्यांचेही पण पोल पडल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर सद्दिवाल यांचेही मोठया प्रमाणत नुकसान झाले आहे  सुदैवाने जीवित हानी टळली. विद्युत तारा ही यामुळे तुटून पडल्या आहेत या उपकेंद्राचे अभियंता विकास जोगदंड यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस स्टेशन मध्ये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालक या ठिकाणाहून फरार झाला आहे तो टीप्पर दिंद्रू ड पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलिस कर्मचारी वसंत नागरगोजे करत आहेत

Monday 3rd of May 2021 07:35 PM

Advertisement

Advertisement