Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने वैकुंठभुमीत वृक्षसंवर्धनासह स्वच्छता मोहीम

    किल्ले धारुर - शहरातील ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्या शेजारील वैकुंठ भुमीत गेल्या तीन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धनाचे काम चालू आहे. किल्ले धारुर परिसरात शनिवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वारा,पाऊस व गारा पडल्या असल्याने या वैकुंठ भूमीतील झाडे वाकली होती. त्याच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणामध्ये गवत व काटेरी झाडे उगवली होती. ती काढून त्या परिसरातील वृक्षसंवर्धनासह स्वच्छता करण्यात आली

     या वैकुंठ भूमी दर रविवारी लोकसहभागातून पाणी देण्याचे काम चालू असते. काल पाऊस पडल्याने झाडांना मुबलक पाणी मिळालेले आहे, परंतु झाडांना काट्यांचा आधार देणे गरजेचे होते व काही झाडांना आळे करणे महत्वाचे असल्याने आज वैकुंठभूमी मध्ये वृक्षसंवर्धनासह स्वच्छता करण्यात आली.

     यावेळी कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, गणेश कापसे, अक्षय बगाडे, विशाल देशमाने, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई व जलदूत विजय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

Monday 3rd of May 2021 07:34 PM

Advertisement

Advertisement