Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

योग,प्राणायाम करा;कोरोनाला हरवा- पांडुरंग जगताप

किल्लेधारूर (वार्ताहर) योगासन व प्राणायाम नियमीत केले तर कोरोना वर मात केली जाऊ शकते या साठी धारूर येथील कोवीड केअर सेंटर वरील कोरोना रुग्नाचे मनोबल वाढवण्या साठी योगाशिक्षक पांडूरंग जगताप हे नियमीत योगा प्रशिक्षण वर्ग घेऊन या कोरोना रुग्नाचा लवकर बरे होण्या साठी उत्साह वाढवत आहेत.  

मागील दोन वर्षांपासून पूर्ण भारतातच नव्हे तर जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.  काय हा कोरोना, पाहीलं तर सूक्ष्म विषाणू. पण आज भल्याभल्यांची झोप उडवली या विषाणूने.सध्या तर जो तो  'रेमडेसिव्हीर' च्या मागे धावतो आहे.तर कुठे ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे रूग्ण दगावतांना दिसत आहेत.परंतु नियमीत योगासने व प्राणायाम केल्याने कोरोनावर मात करून ऑक्सिजन लेवल ही संतुलित ठेवता येते असे मत योग शिक्षक पांडुरंग रमेश जगताप यांनी व्यक्त केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले डाॕ मारूती लगड यांच्या आदेशाने मागील काही दिवसां पासून कोविड केअर सेंटर धारूर येथे नियमित योग सत्र घेतले जात आहेत. योग सत्र यशस्वीते साठी सर्व डाॅक्टर्स, नर्सेस व येथील कर्मचारी अशोक कावळे व माजेद  यांचे सहकार्य मिळत असल्याचे जगताप यांनी सांगितले. सध्या धारूर तालुक्यात दररोज 70 च्या आसपास रूग्ण निघत आहेत. शहरातील दोन्ही सेंटर गच्च भरली आहेत.अशा परिस्थितीत रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता व मनोबल वाढविण्यासाठी पांडुरंग जगताप रोज सकाळी 7 वाजता सेंटर वर हजर होऊन बाधितांना योग, प्राणायाम शिकवतात.ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी भस्त्रिका, कपालभाति व अनुलोम- विलोम हे प्राणायाम रोज 5-15 मिनीटे घेतले जातात. तसेच आसनांमध्ये भुजंगासन व प्रोन पोश्चर( या मध्ये पोटावर झोपून दिर्घ श्वसन केले जाते) फुफ्फुसाची कार्यक्षमता व ऑक्सिजन ची पातळी वाढविण्यासाठी महत्वाचे आहेत. असे जगताप यांनी सांगितले. योग सत्राचा शेवट डाॅ.स्नेह देसाई यांच्या 'पॉझिटीव्ह अफ्रमेशन्स' ने केला जातो. या वर्गाला चांगला प्रतीसाद मिळत आहे

Monday 3rd of May 2021 07:33 PM

Advertisement

Advertisement