Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाईचे तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ; तरूणावर गुन्हा

विनामास्क फिरणाऱ्या तरूणाला दंडाची आणि अँटीजन टेस्टची केली होती सूचना

अंबाजोगाई : मास्क न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडविले आणि अँटीजेन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरूणाने पथकातील अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चाचणीला विरोध केला. ही घटना अंबाजोगाईतील सावरकर चौकात सोमवारी (दि.०३) सकाळी घडली.

'विवेक सिंधू न्यूज'चे अँड्राॅईड‌ ‌‌मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटीजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरूवात झाली. यासाठी अंबाजोगाई शहरात पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर वेणुताई महिला महाविद्यालयासमोर तहसीलदार विपीन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे, तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, महसूल व न.प.चे कर्मचारी, पोलीस हे अँटीजन टेस्ट ड्राईव्हची कार्यवाही करत होते. यावेळी प्रविण राजाभाऊ शेप (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) हा तरूण विनामास्क त्याच्या दुचाकीवरून (एमएच २० बीबी ९२७३) सावरकर चौकाकडून येत होता. पथकाने त्याला अडवून अँटीजन चाचणी आणि विनामास्क असल्याने दंड भरण्याबाबत सुचना केली. त्यामुळे संतापलेल्या प्रविणने सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि अँटीजन चाचणीला विरोध करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी रमेश भानुदास सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून प्रविण शेप याच्यावर कलम ३५३, ५०४, १८८ सह आपत्कालीन व्यवस्था कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Monday 3rd of May 2021 04:31 PM

Advertisement

Advertisement