Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

देवळा येथील शेतकऱ्यांचे महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण

आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

अंबाजोगाई : शेतीला पाणी देण्यासाठी सलग आठ तास सुरळीत वीज पुरवठा करा या मागणीसाठी बुधवारी (दि.०७) देवळा येथील शेतकरी महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

 अंबाजोगाई तालुक्यात देवळा,पाटोदा, ममदापूर, अकोला, तडोळा, मुडेगांव, अंजनपूर, कोपरा, आपेगाव, धानोरा व परिसरातील गावे ग्रीनबेल्ट म्हणून ओळखली जातात. सध्या मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. कॅनॉलला पाणी सुटल्यामुळे ऊसाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. मात्र, या परिसरातील शेतकºयांनी वीजबिले भरूनही महावतिरणकडून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. जरी वीजपुरवठा सुरू असला तरी तो अत्यंत कमी दावाने सोडला जातो. त्यामुळे विद्युत पंप चालत नाहीत. तर कमी दाब असल्यामुळे अनेक विद्युत पंप निकामी झाले आहेत. याचा आर्थिक भुर्दंडही शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. धरणातून कॅनॉलला ठराविक कालावधीसाठी पाणी सोडले जाते. या काळात शेतातील पिकांना पाणी देणे बंधनकारक असते. मात्र, अशा स्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी द्यायचे कसे? पाण्याची उपलब्धता असतांना जर विद्युत पुरवठा नसेल तर उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा उपयोग काय? अशी स्थिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सलग आठ तास विद्युत पुरवठा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी देवळा व परिसरातील शेतकरी महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. 

 यासंदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता देवळा व धानोरा हे गाव सबस्टेशनच्या शेवटच्या टोकावर आहे. सर्वच शेतकरी शेतीला एकदम पाणी देत असल्याने लोड येत असल्यामुळे विद्युत प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. यावर मार्ग काढला जाईल असे देशपांडे यांनी सांगितले.

Wednesday 7th of April 2021 08:51 PM

Advertisement

Advertisement