Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

प्रवाशांमध्ये निरूत्साह, बसस्थानकात शुकशुकाट

अंबाजोगाई -   दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर बससेवा सुरू झाली असली तरी अजूनही प्रवासी प्रवास करण्यासाठी धजावत नाहीत. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात निरूत्साह दिसून आला. मंगळवारी बसस्थानकात शुकशुकाट जाणवला. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक कडक निर्बंध आखण्यात आले. बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन झाला. या कालावधीत बीड जिल्ह्यातील बससेवा बंद ठेवण्यात आली होती. ५ एप्रिलपासून पुन्हा बससेवा सुरू झाली. मंगळवारी अंबाजोगाईच्या बसस्थानकात प्रवाशांचा शुकशुकाट जाणवला. अंबाजोगाई आगारातून मंगळवारी लातूर, बीड, परळी, औरंगाबाद व मुरूड याठिकाणी बसफेºया झाल्या. मात्र, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने लांबपल्याच्या बस अद्यापही सुरू झाल्या नाहीत. जवळच्याच मोजक्या गावांमध्ये बसफेºया सुरू झाल्या आहेत. बसमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांना सक्तीने मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवून आसन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

Tuesday 6th of April 2021 10:06 PM

Advertisement

Advertisement