Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शेतजमीन नावावर करून देण्यासाठी छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

परळी : तुझ्या नावावरील शेतजमीन पतीच्या नावावर कर म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा सातत्याने छळ केला. अखेर छळाला त्रासलेल्या त्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.०५) रात्री परळी शहरातील माऊलीनगर भागात घडली. याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि दिरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

दामिनी विशाल मुंडे (वय २४, रा. तळेगाव, ता. परळी) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. दामिनीच्या नावावर अंबाजोगाई तालुक्यातील चंदनवाडी शिवारात शेतजमीन आहे. ही जमीन पतीच्या नावावर कर म्हणून तिला पती विशाल, सासरा वैजनाथ मुंडे, सासू मंगलबाई मुंडे आणि दीर नितीन हे नेहमी शारीरिक आणि मानसिक छळ करत. तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत असे. तिला नांदायला देखील घेऊन जात नव्हते. या त्रासाला कंटाळलेल्या दामिनीने सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास परळी शहरातील माऊलीनगर येथील बहिणीच्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दामिनीची बहिण पूजा रवींद्र मुंडे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास शा. पोलीस निरिक्षक खरात करत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Tuesday 6th of April 2021 10:01 PM

Advertisement

Advertisement