Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आंबेवडगाव येथे बारा वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

धारूर : तालुक्यातील आंबेवडगाव येथे आजोळी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाला शुक्रवारी (दि.०२) शेतात खेळत असताना सापाने चावा घेतला होता. या मुलाचा सोमवारी (दि.०५) लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार असुरू असताना मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, असोला येथील विक्रम रेपे आणि त्यांची पत्नी संगिता हे दांपत्य ऊस तोडणीसाठी कर्नाटक राज्यात गेले आहे. या दाम्पत्याला एका मुलगी आणि दोन मुले अशी तीन अपत्ये आहेत. त्यापैकी सागर या मुलास त्यांनी आजोळी आंबे वडगाव येथे आजोबा गोरख सोनाजी नायकोडे यांच्याकडे सोडले होते.  शुक्रवारी दुपारी सागर शेतामध्ये खेळत असताना परड जातीच्या सापाने त्याच्या पायाला चावा घेतला. त्याच्यावर धारूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूरच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला अशी महिती महादेव नायकोडे यांनी दिली. 

Tuesday 6th of April 2021 09:45 PM

Advertisement

Advertisement