Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लॉकडाऊन विरोधात गेवराईतील व्यापाऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन

गेवराई : दहा दिवसाचा लॉकडाऊन झाला तरीदेखील प्रशासणाने पुर्व कल्पना न देताच दि ५ सोमवारी रात्री जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय वगळता सर्व व्यापार बंद ठेवण्याचे आदेश काढले हा आदेश  सर्व छोट मोठ्या व्यावसायकावर  अन्याय करणारा   असून लादलेले  नियम रद्द करावे  मागणीचे निवेदन गेवराई तहसीलदार यांना  व्यापाऱ्याच्या वतीने देण्यात आले आहे 

 कोरोना  रुणाची संख्यां दिवसे दिवस वाढत जात असुन या पार्श्वभुमीवर जिल्हा अधिकारी यांनी जिल्ह्यात दहा दिवसाचा कडक लॉकडावुन लागु केला होता   हा शेवटचा लॉकडावुन आहे सहकार्य करा असे जिल्हाधिकारी यांनी सागीतले होते व्यापारी वर्गानी याला सहकार्य केले होते परंतु  दि ५ रोजी प्रशासणाने पुन्हा जिल्ह्यामधे अत्य आवशक सेवा देनारे  व्वयवसाय वगळता सर्व व्यवसाय पुर्ण पणे ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले .त्यामुळे सर्व छोट मोठ्या व्यवसाय चालकात तिवृ नाराजी आसुन या आदेशा संदर्भात  गेवराई शहरातील व्यापारी वर्गाची बैठक झाली या मध्ये शासणाने सर्व छोट मोठ्या व्यापार्यावर आन्याय केला असुन हा निर्णय व्यापारी व दुकानामध्ये  काम करणाऱ्या मुनीमाचे कंबरडे मोडनारा आहे. त्यामुळे  आदेश रद्द करावा नियम अटी घालुन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी या मागणी निवेदन  व्यापारी वर्गाच्या वतीने  ६ रोजी सकाळी १२ वा  तहसीलदार यांना  देण्यात आले

Tuesday 6th of April 2021 09:41 PM

Advertisement

Advertisement