Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

'स्वाराती'चे सीटी स्कॅन तीन दिवसांपासून बंद

न्युमोनिया आणि कोवीड रुग्ण सेवेवर होत आहे परिणाम; सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक फटका

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशीन गेली तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न्युमोनिया आणि कोवीड आजारांवर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या सेवेवर विपरीत परीणाम होत आहे.शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद पडल्याने खाजगी सिटीस्कॅन वाले प्रति रुग्ण ३,५००रु पये घेत असल्याने सामान्य रुग्णांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

     कोवीड च्या  दुसऱ्या लाटे  मध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका हॉटस्पॉट बनत चालला असून कोवीड आणि न्युमोनिया सदृश्य आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या येथील डीसीसीएच सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोवीड, न्युमोनिया सह इतर आजाराचे योग्य निदान करण्यासाठी सीटी स्कॅन च्या निदानाचे खुप महत्त्व आहे. रुग्णालयात सतत वाढत जाणारा रुग्णांचा ताण या सीटी स्कॅन मशीनच्या स्वॉफ्टवेअरवर आल्यामुळे या स्वॉफ्टवेअरमध्ये  मध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्यामुळे सीटी स्कॅन बंद झाले ते आज सोमवार पर्यंत सुरु झालेले नाही.रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद पडल्याने खाजगी सिटीस्कॅन सेंटर वाले प्रत्येक रुग्णाकडून ३५००रुपये दर आकारणी करत आहेत.याचा मोठा आर्थिक भुरदण्ड सामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे.

मंगळवारी दुरुस्तीसाठी येणार अभियंता 

या संदर्भात सीटी स्कॅन सेंटरवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय स्टाफ शी चर्चा केली असता त्यांनी सीटी स्कॅन मध्ये आलेल्या बिघाडास दुजोरा दिला असून स्वॉफ्टवेअर मधील प्रॉब्लेम दुरुस्ती साठी मंगळवारी कंपनीचे  अभियंता  येणार असून प्रॉब्लेम सॉल झाल्यानंतर सीटी स्कॅन नियमित सुरु होईल असे सांगितले.

जम्बो कोवीड सेंटरला स्वतंत्र स्कॅन मशीन मंजुर करा : आ. नमिता मुंदडा

अंबाजोगाई येथील स्वाराती कोवीड सेंटर मध्ये न्युमोनिया, कोवीड आणि सारी आजाराचे जवळपास ३०० रुग्ण दाखल आहेत. याव्यतिरीक्त रुग्णालयाच्या विविध आंतररुग्ण कक्षातील अत्यावश्यक रुग्णांचे सीटी स्कॅन करावे लागते. या व्यतिरिक्त लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या कोवीड रुग्णांचे स्कॅन ही स्वारातीच्याच स्कॅन मशीनवर करण्यात येतात. या सर्वांचा ताण येथील मशीनवर येत असून याचा परीणाम सर्वच रुग्ण सेवेवर होतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोवीड सेंटर साठी स्वतंत्र सीटी स्कॅन मशीन मंजुर करण्यात यावी अशी मागणी आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Tuesday 6th of April 2021 01:08 AM

Advertisement

Advertisement