Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

नेकनूरमध्ये नागरिकांनी मोबाईल चोर पकडला

दोन जणांचे मोबाईल चोरी करताना ताब्यात

बीड : बीड शहर व परिसरात मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले अाहे. बीडमध्ये तीन दिवसांपूर्वी नागरिकांनी एका मोबाईल चोराला पकडले होते त्यानंतर रविवारी नेकनूर मध्ये एका मोबाईल चोराला पकडले गेले. 

उद्धव विष्णू जगताप (३५, रा. बंधेवाडी ता. बीड) हे नेकनूर येथे गेले असता नुरानी चौक परिसरातून त्यांचा ४ हजार रुपयांचा मोबाईल व शेख इब्राहिम यांचा मोबाईल अजय कचरु उपळकर (रा. राजीव नगर, बीड) याने चोरला व कुठे तरी फेकून दिला ही बाब लीक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्यावर अजय उपळकर पळून जातना दिसला नागरिकांनी पाठलाग करुन त्याला पकडून नेकनूर पोलिसांच्या ताब्यात दिलेे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या मोबाईल चोराकडून अनेक मोबाईलचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात या दृ़ष्टीने सध्या पोलिस तपास करत आहेत. 

Tuesday 6th of April 2021 01:03 AM

Advertisement

Advertisement