Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेळ्या चारण्याच्या कारणावरुन शिंगनवाडीत वृद्धाला दगडाने मारहाण

जबडा फ्रॅक्चर: एकाविरोधात सिरसाळा पोलिसांत गुन्हा

परळी : शेळ्या आमच्या शेतात का चारता, तुमच्या शेतात चारा असे म्हणल्याच्या रागातून ८० वर्षीय वृद्धाला चेहऱ्यावर दगडाने मारहाण करुन जबडा फ्रॅक्चर करण्यात आल्याची घटना धारुर तालुक्यातील शिंगनवाडीत ३१ मार्च २०२० रोजी घडली. या प्रकरणी रविवारी ४ एप्रिल रोजी सिरसाळा पोलिसांत एमएलसी जबाबावरुन गुन्हा नोंदवला गेला.

ज्ञानोबा शहाजी सोनवळे (८०, रा. शिंगनवाडी ता. धारुर) असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ३१ मार्च रोजी ते शिंगनवाडी येथे लक्ष्मी नावाच्या स्वत:च्या शेतात शेळ्या चारत असताना गोरख शंकर सोनवळे हा तिथे त्याच्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन आला यावेळी ज्ञानोबा यांनी आमच्या शेतात शेळ्या का चारता असे त्यांना म्हटले. याचा राग आल्याने गोरख सोनवळे यांनी ज्ञानोबा यांना शिविगाळ करुन चेहऱ्यावर दगडाने मारहाण केली यात ज्ञानोबा यांचा जबडा फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी एमएलसी जबाबावरुन रविवारी सिरसाळा पोलिसांत गोरख शंकर सोनवळे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार मुंडे हे करत आहेत 

Tuesday 6th of April 2021 01:02 AM

Advertisement

Advertisement