बीएसनएनएलचे १ लाख १३ हजारांचे केबल वायर चोरी
पेठ बीड पोलिसांत गुन्हा नोंद
बीड : शासनाची दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या १ लाख १३ हजार रुपयांच्या केबल वायरची चोरी झाल्याची घटना बीडमध्ये समोर अाली. या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन पेठ बीड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीएसएनएलचे कनिष्ठ दुरसंचार अधिकारी जगदीश कैलास सिंदव (२६, रा. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बीड शहरातील पेठ बीड हद्दीतील जुना मोंढा ते सावतामाळी चौक या दरम्यान असलेल्या अमरधाम स्मशानभूमी जवळील पुल परिसरात बीएसएनएलची डीपी आहे. या डीपीमधून यूजी वायर तोडून सुमारे १३० मिटर लांब ८०० पेअर यूजी केबल वायर ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १ लाख १३ हजार ८०० रुपये इतकी आहे हे २ एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान चोरी गेले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पेठ बीड पोलिस करत आहेत.
