Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

डोके फोडून जीवे मारण्याची धमकी;चौघांवर गुन्हा

गेवराई  : आकडा टाकून वीज चोरी करताना शेजारच्यांनी स्पार्किंग होऊन ठिणग्या जनावरांच्या अंगावर पडत असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने कुटुंबाला बेदम मारहाण करुन चौघांचे डोके फोडल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील रेवकी येथील विठ्ठलनगरमध्ये रविवारी सकाळी घडला. या प्रकरणी चार जणांविरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा नोंद केला गेला.

 मिना महादेव चितळकर (४०, रा. विठ्ठलनगर) यांच्या तक्रारीनुसार, रामदास मारुती शिंदे हे त्यांचे शेजारी असून रविवारी सकाळी ते वीज तारेवर आकडा टाकून वीज चोरी करत होते यावेळी आकडा टाकताना वीज तारांमध्ये घर्षण होऊन स्पार्किंग झाली याच्या ठिगण्या चितळकर यांच्या घराजवळ बांधलेल्या बैलांच्या अंगावर पडल्या. ही बाब िमना यांच्या मुलाने रामदास यांना सांगताच त्यांनी वाद घालून शिविगाळ केली याचे पर्यवसन भांडणात झाले. रामदास व त्यांच्या कुटुंबियांनी मीना, त्यांचा मुलगा, पती व सासू यांच्या डोक्यात मारुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकरणी गेवराई पोलिसांत रामदास मारुती शिंदे, सतिश रामदास शिंदे, अनिल भीमराव शिंदे, पंडित  मारुती शिंदे (सर्व रा. विठ्ठलनगर, रेवकी) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 

Tuesday 6th of April 2021 01:00 AM

Advertisement

Advertisement