Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लॉकडाऊनमध्येही हॉटेल सुरु ठेवणे आले अंगलट

बीड : लॉकडाऊन असतानाही हॉटेल सुरु ठेवणे चार हॉटेल चालकांच्या अंगलट आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत हॉटेल चालकांवर गुन्हे नोंद केले. रविवारी ही कारवाई करण्यात आली. 

 जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान दहा दिवसांचे लॉकडाऊन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जाहीर केले होते. या काळात हॉटेल, बार यांना केवळ पार्सल सुविधा देता येईल असे आदेश दिले गेले होते मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हॉटेलांमध्ये बसून ग्राहकांना सुविधा मिळत होत्या. बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाली परिसरात काही ठिकाणी हॉटेलांमध्ये अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे,फौजदार रोटे व कर्मचारी तानाजी डोईफोडे यांनी पाहणी केली यावेळी समर्थ बिअरबार अॅण्ड रेस्टॉरंट, हॉटेल तुळजाभवानी, हॉटेल जगदंब, हॉटेल नरसिंह हे चार हॉटेलचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. या हॉटेल चालकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस अधीक्षक आर. राजा, अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Tuesday 6th of April 2021 12:58 AM

Advertisement

Advertisement