Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

एक हजारांची लाच घेताना शाखा अभियंता चतुर्भूूज

गेवराई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बीड : गावातील सार्वजनिक शौचायलय बांधकामासाठीच्या अंदाजपत्रकावर तांत्रिक मान्यता देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा गेवराई पंचायत समितीमधील शाखा अभियंता शेख समद नूर महोम्मद सोमवारी एसीबीच्या गळाला लागला. गेवराई पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हा नोंेद करण्यात आला.

 जिल्ह्यात मागील काही दिवसांत लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे ३१ मार्च रोजीच माजलगावात बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला एसीबीने गजाआड केले होते त्यानंतर सोमवारी गेवराईत कारवाई करण्यात आली. गेवराई तालुक्यातील एका गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठीच्या अंदाजपत्रकावर तांत्रिक मान्यता देण्यासाठी गेवराई पंचायत समितीमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता शेख समद नूर महोम्मद यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. 

लाच मागणी पडताळणी करण्यात आली त्यानंतर सोमवारी दुपारी गेवराई पंचायत समितीत सापळा लावण्यात आला. एक हजार रुपयांची लाच स्विकारताच शाखा अभियंता शेख याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. एसीबीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोलिस निरीक्षक राजकुमार पाडवी, रविंद्र परदेशी व कर्मचाऱ्१यांी ही कारवाई केली.

Tuesday 6th of April 2021 12:57 AM

Advertisement

Advertisement