Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कवडगावात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन लाखांचा ऐवज लांबवला

गेवराई : तालुक्यातील बंगालीपिंपळ्यानजिकच्या कवडगावात रविवारी (दि.4) मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेतकर्‍याच्या पत्र्याचे घराचे कुलूप तोडून आतमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे तसेच कापूस विकून आलेली रक्कम असा 2 लाख 18 हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

गोरख आश्रुबा आघाव (रा.कवडगाव,बंगालीपिंपळा) हे शेतकरी आहेत. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आघाव यांच्या पत्र्याच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. डब्यातील सोन्या-चांदीचे दागिणे व शेतातील वीस क्विंटल कापूस विक्रीतून मिळालेले 1 लाख लाख रुपये तसेच मजुरीसह बोकड,शेळी विक्रीतून मिळालेले 50 हजार असा एकूण 2 लाख 18 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी चकलांबा पोलीसांनी भेट दिली. या प्रकरणी अज्ञाताविरुध्द चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Tuesday 6th of April 2021 12:54 AM

Advertisement

Advertisement