Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

आष्टीच्या कासारी जवळील घटना

आष्टी : रांजणगावहून दुचाकीवर गावी परतणा-या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील कासारी गावाजवळ सोमवारी (दि.५) पहाटे घडली.

    उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंतनगर येथील रहिवासी क्रांती इंद्रजित नागरगोजे हे आपल्या दुचाकीवरुन ( क्र. एम.एच. १२ टीएफ २६३)  रांजणगाव येथून गावाकडे परतत असताना सोमवार पहाटे ५ वाजेच्या सुमारास बीड – अहमदनगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील कासारी गावानजीक अज्ञात वाहनाने  त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी ठाण्याचे पोलिस कर्मचारी  ए.एम सुंबरे, के.आर. शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत  पंचनामा केला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.आष्टी पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून पुढील तपास पोलिस नाईक ए.एम सुंबरे हे करत आहेत.

Tuesday 6th of April 2021 12:49 AM

Advertisement

Advertisement