Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बनावट कागदपत्राआधारे जमीन लुबाडली; निवृत्त मंडळाधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

बीड : बनावट कागदपत्रे तयार करुन एक गुंठा जमीन परस्पर लुबाडल्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात उघडकीस आला. सात वर्षांनंतर या प्रकरणी निवृत्त मंडळाधिकाऱ्यासह पाच जणांवर रविवारी (दि.४) फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

नागनाथ रंगराव मुंडे (रा. उजनी ता.अंबाजोगाई) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची उजनी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. वाटणीपत्रानुसार त्यांना जमीन मिळणे अपेक्षित होते;परंतु तत्कालीन मंडळाधिकारी जे.एच.शेख (रा.मोरेवाडी हमु.औरंगाबाद) यांना हाताशी धरुन त्यांच्या भावांनी ०.२५ आर जमीन परस्पर क्षेत्रफोड करुन बनावट सातबारा तयार करुन स्वत:च्या नावे केली. ८ मे २०१३ रोजी तलाठी कार्यालयात हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी नागनाथ मुंडे यांनी मूळ क्षेत्रफळ व बनावट कागदपत्रांचे पुरावे गोळा करुन तक्रार दिली, त्यावरुन बर्दापूर ठाण्यात निवृत्त मंडळाधिकारी जे.एच.शेखसह पंडित रंगराव मुंडे, किसन रंगराव मुंडे, बालाजी रंगराव मुंडे, सुभाष दत्तू मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास उपनिरीक्षक रविराज जमादार करत आहेत.

Tuesday 6th of April 2021 12:48 AM

Advertisement

Advertisement