Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

'स्वाराती' रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचारासाठी २५ डॉक्टरांना प्रतिनियुक्ती

आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली होती मागणी

अंबाजोगाई : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीसीसीएच सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ वाढवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी २५ डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या कोवीड सेंटर मध्ये केल्या आहेत. आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत ही मागणी केली होती.

कोवीड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असतांनाच सरदारांची वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीसीसीएच मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची होणारी ओढाताण लक्षात घेता या सेंटरला वैद्यकीय महाविद्यालयातील इतर विभागातील डॉक्टरांची  प्रतिनियुक्त्या कराव्यात अशी मागणी आ. सौ. नमिता मुंदडा यांनी नुकतीच स्वारीतीच्या अधिष्ठाता कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत केली होती. आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या या सुनेचे गांभीर्य लक्षात घेत अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी २५ डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या कोवीड सेंटरमध्ये केल्या आहेत.

अधिष्ठाता कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या या आदेशात कोवीड-१९ या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन कोवीड कक्षामध्ये कार्यरत मनुष्यबळाचा आढावा घेणे कामी दिनांक ०३ एप्रिल रोजी अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख यांचेसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील बैठकीत झालेल्या चर्चेनुसार खालील पदव्युत्तर कनिष्ठ निवासी- ३ व पदवीका क. निवासी-२ / एच.ओ. यांची प्रतिनियुक्ती  तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  सदरील डॉक्टरांनी प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होऊन तसा अहवाल विभाग प्रमुखांमार्फत अधिष्ठाता कार्यालयास सादर करण्यासाठी बजावले आहे. 

अधिष्ठाता कार्यालयाने काढलेल्या या आदेशात कनिष्ठ निवासी डॉ. अविनाश सानप, डॉ. संध्या हिलालपुरे, डॉ. डॉ. पुजा चंडेवार, डॉ. विजयकुमार पवार, डॉ. शरद शेळके, डॉ. साई सवताळे, डॉ. नितीन कांबळे, डॉ. माहेश्वरी चाटे, डॉ. रसिका पेंडोर, डॉ. वर्षा गुट्टे, डॉ. मिताली चाफे, डॉ. लक्ष्मण लाड, डॉ. समिक्षा शेलार, डॉ. डॉ. आरती राठोड, डॉ. अकिताबेन पटेल, डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. नरेश बुरटे, डॉ. अमोल केंद्रे, डॉ. अश्र्विन अमृतवार, डॉ. रामा साठवणे, यांच्या सह हाऊस ऑफीसर डॉ. अक्षता मस्ती, डॉ. अंजली भणगे, डॉ. निता जैन, डॉ. आकाश मोरे यांची कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रतीनियुकीत करण्यात आली आहे. 

Monday 5th of April 2021 07:39 PM

Advertisement

Advertisement