Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आ. बाळासाहेब आजबेंनी घेतली आढावा बैठक

सर्व अधिकाऱ्यांनी अंग झटकून काम करणे गरजेचे : आ. बाळासाहेब आजबे

आष्टी (प्रतिनिधी) : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विभागाच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी कंबर खसून काम करण्याची गरज असून, नागरिकांनीही कामा शिवाय बाहेर पडू नये, जे कोणी मोकार बाहेर फिरतात त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची सुचना आ.बाळासाहेब आजबे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आष्टी येथील तहसिल कार्यालयात आ.बाळासाहेब आजबे यांनी तहसिलदारांच्या कार्यालयात तालुक्यातील सर्व प्रमुख अधिका-यांची बैठक आज सोमवार दि.5 रोजी दुपारी 12 वाजता आढावा बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी तहसिलदार राजाभाऊ कदम,नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे, नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे, आष्टी आगाराचे आगार प्रमुख संतोष डोके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे, पोलिस उपनारीक्षक भारत मोरे, नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी प्रेमकुमार म्हस्के यांच्यासह आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ढे बोलतांना आ. आजबे म्हणाले,यापुढे प्रशासनाने कोरोना बाधित व्यक्तीचे नावे जाहिर करून कोणालाही होम आयसोलेशन न करता त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या भागात कोरोनाचा रूग्ण आला आहे.त्यावर प्रशासनाची करडी नजर तर आहेच पण नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.तसेच येणा-या काळात कोरोनाचा पादुर्भाव जास्त होत आहे. कोणीही अंगावर दुखणे न काढता कोरोना पाॅझिटिव्ह हा रिपोर्ट आला कीच उपचारासाठी रूग्णालयात दाखल होणे गरजेचे असल्याचे तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी सांगितले.

पाण्याची नासाडी थांबवा - आ.आजबे

मागच्या वर्षी समाधानकारक जरी पाऊस झाला असला तरी आता रुटी प्रकल्पात तीस टक्केच पाणी शिल्लक आहे.पण काहि जणांनी पाणी सोडून देण्याची मागणी केली.पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. तसेच नगर पंचायतनेही पाण्याची नासाडी थांबवावी अश्या सुचनाही आ.बाळासाहेब आजबे यांनी दिल्या.

नागरिकांनी व अधिका-यांनी मास्क काढून बोलू नये
प्रत्येक जण तोडांला मास्क बांधतो पण बोलायचे असेल तर मास्क खाली काढून बोलत असल्याने तोडांतून मोठ्या प्रमाणावर विषाणू बाहेर पडतात.त्यामुळे कुणीही बोलतांना अधिकारी व नागरीकांनी तोडांचा मास्क काढून बोलू नये व याबाबत जनजागृृृृती करण्याची गरज आहे.
- राजाभाऊ कदम, तहसिलदार आष्टी

Monday 5th of April 2021 12:37 PM

Advertisement

Advertisement