कोरोनाने घेतला आणखी चौघांचा बळी; जिल्ह्यात ४८६ नवे रुग्ण
३३३ कोरोनामुक्त
बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोना बाधितांनी उच्चांकी ४८६ संख्या गाठली. तसेच चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली झाली तर ३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात २ हजार ९५९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यापैकी २ हजार ४७३ अहवाल निगेटिव्ह आले तर तब्बल ४८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात बीड तालुक्यात सर्वाधिक १२०, अंबाजोगाई १०७, आष्टी ५७, धारुर ८, गेवराई ३०, केज ३४, माजलगाव ३७, परळी ४३, पाटोदा २६, शिरुर १५ आणि वडवणी तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे.
तसेच रविवारी जिल्ह्यात ४ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात केशवनगर अंबाजोगाई येथील ८२ वर्षीय पुरुष, कुरुबू गल्ली, गेवराई येथील ८३ वर्षीय पुरुष, गोमळवाडा (ता.शिरुरकासार) येथील ६५ वर्षीय महिला आणि शिक्षक कॉलनी बीड येथील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच ३३३ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता एकूण बाधितांची संख्या २७ हजार २०० इतकी झाली आहे. पैकी २४ हजार ५१६ कोरोनामुक्त झाले असून एकूण मृत्यूची संख्या आता ६५९ झाली आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
