Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

निर्णयात बदल : केवळ लक्षणे असणाऱ्यांचीच कोरोना चाचणी

बीड : खाजगी रूग्णालयात दाखल उपचारासाठी जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. या रविवारी बदल केले आहेत. केवळ शरिक रूग्णांची सरसकट चाचणी केली जाणार आहे. बाह्य रूग्ण विभागात जाणाऱ्या परंतु केवळ लक्षणे असणाऱ्यांचीच कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अंगावर आजार काढू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यू आणि नव्या रूग्णांचा उच्चांक होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून काही कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच खाजगी रूग्णालयात ॲडमिट असलेल्या प्रत्येक रूग्णाची आरटपीसीआर तर ओपीडीत येणाऱ्यांची ॲन्टिजन तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढला होता. यावर सामान्य नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना भेटले. काही मुद्दे समजावून सांगितल्यानंतर रविवारी या आदेशात बदल करण्यात आले. जे रूग्ण ॲडमिट आहेत, त्यांचीच कोरोना चाचणी बंधनकारक असेल. तसेच जे ओपीडीमध्ये येणार आहेत व ज्यांना लक्षणे आहेत, त्यांचीच कोरोना चाचणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. या सर्व चाचण्या खाजगीत न करता शासकीय केंद्रांवर केल्या जाणार आहेत. तसेच मोबाईल टिमचेही नियोजन केले जाणार आहे

दोन दिवसांपूर्वीच्या आदेशाबाबत काही गैरसमज होते. आदेशाला विरोध नाही, परंतु गैरसमज दुर होऊन स्पष्टता यावी, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशाचे आमचे सर्व डॉक्टर पालन करतील असा विश्वास आहे. सामान्य नागरिकांनी घाबरून जावू नये.
-डॉ.अनुराग पांगरीकड, अध्यक्ष आयएमए बीड

Monday 5th of April 2021 07:29 AM

Advertisement

Advertisement