Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रिक्षाचालकाला मारहाण करत रक्कम लांबवली

अंबाजोगाई : रिक्षा घेवून जाणार्‍या तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करत त्याच्याकडील रोकड व मोबाइल लंपास केल्याचा प्रकार शहरातील शेपवाडी परिसरात शनिवारी (दि.3) दुपारी घडला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला.

खंडू केरबा हरकळ (29 रा.धायुगडा पिंपळा) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास शेपवाडी परिसरातून रिक्षा क्र.(एम.एच.44 सी 5778) घेवून गावी जात होते. यावेळी समीर दिलावर शेख (रा.शेपवाडी) याने रिक्षा अडवून खंडू यांना खाली ओढून मारहाण करत त्यांच्याकडील 2 हजार 700 रुपयांची रोकड व मोबाइल असा 4 हजार 70 रुपयांचा ऐवज काढून घेत नंतर त्याच्या अनोळखी साथीदाराच्या दुचाकीवर बसून पलायन केले. त्यानंतर खंडू हरकळ यांनी शहर ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा नोंद झाला. उपनिरीक्षक गव्हाणे तपास करत आहेत.

Sunday 4th of April 2021 11:40 PM

Advertisement

Advertisement