Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बनावट फेर ओढून शेतकर्‍याची फसवणूक; सेवानिवृत्त मंडळाधिकार्‍यासह दोघावर गुन्हा

तलवाडा : एका शेतकर्‍याची 20 हेक्टर जमिन गावातील दुसर्‍या शेतकर्‍याच्या नावावर केल्याचा प्रकार तालुक्यातील आनंदवाडीत समोर आला. या प्रकरणी सेवानिवृत्त मंडळाधिकार्‍यासह जमिन नावावर करुन घेणार्‍या शेतकर्‍यावर तलवाडा ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला.

पोलीसांच्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर ते 3 एप्रिल 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत कृष्णा लक्ष्मण तांगडे (रा.आंनदवाडी) या शेतकर्‍याने फिर्याद दिली. कृष्णा यांची आनंदवाडी शिवारातील गट क्र. 1704 मध्ये 55 आर जमिन आहे. त्यातील 20 आर जमिनीचे बनावट व बोगस फेर करुन घेत सेवानिवृत्त मंडळाधिकारी बी.एस.खेडकर यांनी ती जमिन अमृत बापु तांगडे याच्या नावावर केली. त्यावरुन दोघांविरुध्द तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. उपनिरीक्षक माने अधिक तपास करत आहेत.

Sunday 4th of April 2021 11:39 PM

Advertisement

Advertisement