Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी तरुणाची आत्महत्या

अंबाजोगाई : तालुक्यातील आपेगाव येथील ३६ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

 आपेगाव येथील गहिनीनाथ हरिदास शिंदे (वय ३६) हा तरुण शेती करीत होता. रविवारी सकाळी घरातून बाहेर पडत गहिनीनाथ शिंदे हे स्वतःच्या शेतात गेले. त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ घनश्याम शिंदे हे शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच बनसारोळ्याचे बिट जमादार पांडुरंग वाले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. मात्र गहिनीनाथ शिंदे या तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. घनश्याम शिंदे यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग वाले हे करीत आहेत.

Sunday 4th of April 2021 11:36 PM

Advertisement

Advertisement