Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

..अन् आष्टीचे तहसीलदार उतरले रस्त्यावर!

आष्टीत रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सतर्क

आष्टी(प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने तालका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.रविवार स्वत;तहसिलदार राजाभाऊ कदम हे आपल्या कर्मचा-यांसह रस्त्यावर उतरले व शहरातील मास्क न लावणा-यां नागरीकांना व दुकानदारांना कारवाई करण्याच्या सुचना देत मास्क न लावणा-यांना दुकानात प्रवेश देऊ नये,तसेच नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांना शहरात नियम न पाळणा-यांवर करडी नजर ठेवण्याच्या सुचना देत नागरीकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताच विनाकरन बाहेर न फिरता घरीच थांबण्याचे अहवान तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

            कोरोनाची दुसरी लाट आली असून याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.वारंवार अहवान करूनही नागरीक नियम पाळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी

वाढत आहे.त्यात बीड जिल्ह्याची व आष्टी तालुक्याची रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.या अनुषंगाने आष्टीचे तहसिलदार राजाभाऊ कदम कर्मचा-यांसमावेत रस्त्यावर उतरून शहरातील दुकानदारांना तसेच मास्क न लावणा-या नागरिकांना खडे बोल सुनवत नियम न पाळल्यास वेळप्रसंगी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच शहरातील नियम न पाळणा-यांवर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी कडक नियमावली करून कर्मचा-यांचे पथक शहरात तैनात करण्याच्या सुचनाही तहसिलदार यांनी दिल्या.यावेळी नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे,मंडळधिकारी शिवकुमार सिंघनवाड,पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्यासह नगर पंचायतचे,

संजय कुलकर्णी,प्रशासकीय अधिकारी प्रेमकुमार म्हस्के यांच्यासह कर्मचारी व पोलिस उपस्थित होते.

आणखी कडक कारवाई करू-तहसिलदार
आष्टी तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचा अकडा वाढतच आहे.सध्या दिडशेच्यावर रूग्ण येथे उपचार घेत आहेत.अशीच परिस्थिती राहिली तर रूग्णांना उपचार घेण्यासाठी आणखी कोव्हीड सेंटर उभारावे लागतील.त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे,नसता नियम न पाळणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-राजाभाऊ कदम,तहसिलदार आष्टी
तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्या आदेशाने दहा दिवसात नियम न पाळणा-यांकडून सुमारे 16 हजार आठशे रूपये दंड वसूल केला असून,आता दररोज नगर पंचायतचे,तहसिल,पंचायतसमिती व पोलिस प्रशासनाचे प्रत्येकी दोन कर्मचारी एकूण दहा कर्मचारी दररोज नियम न पाळणा-यांवर करडी नजर ठेवणार आहे.
-प्रेमकुमार म्हस्के,प्रशासकीय अधिकारी न.प.आष्टी


Sunday 4th of April 2021 11:29 PM

Advertisement

Advertisement